सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 27 ऑक्टोबर 2021 (08:34 IST)

मॅट्रोमोनी साईटवरुन लाखोंचा गंडा घालण्याऱ्या दोन नायजेरियन आरोपींना दिल्लीतून अटक

मॅट्रोमोनी साईटद्वारे विवाहइच्छुकांना गंडा घालणाऱ्या दोन नायजेरीयन नागरिकांना पुणे सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पुणे सायबर पोलिसांनी आरोपींना सोमवारी (दि.25) रात्री पावणे अकराच्या सुमारास दिल्लीतून अटक केली आहे. आरोपींनी परदेशात नोकरी करत असल्याचे सांगून पुण्यातील महिलेची 12 लाखाची फसवणूक  केली होती. हा प्रकार जून 2020 ते जुलै 2020 या कालावधीत घडला होता.
 
फसवणूक झालेल्या महिलने पुणे शहर सायबर पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. चिदिबेरे नवोसु उर्फ जेम्स नवोसु  (वय-36) ओकोरो बेसिल इफेनीचुकु उर्फ लेट क्लेक्सुकु (वय-41 दोघे रा. बी. 35, ओमिक्रॉन 1 ए, ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश, मूळ रा. नायजेरिया) असे अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.त्यांना सुरजपूरच्या न्यायालयात  हजर केले असता न्यायालयाने त्यांची 29 ऑक्टोबर पर्यंत ट्रान्झिट रिमांड मंजूर केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील  एका महिलेची जून 2020 ते जुलै 2020 या कालावधीत विवाह संकेतस्थळावर अज्ञात व्यक्तीची ओळख झाली.त्याने परदेशात नोकरी करत असल्याचे सांगितले.त्यानंतर महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळी कारणे सांगून महिलेला दोन बँक खात्यात पैसे भरण्यास भाग पाडले.आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून 12 लाख 19 हजार 949 रुपये घेऊन फसवणूक केली होती.या गुन्ह्यामध्ये सायबर पोलिसांनी तात्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला.त्यावेळी आरोपी ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेशात असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांच्या पथकाने  उत्तर प्रदेशात जाऊन आरोपींना अटक केली.