पुणे महापालिकेची मद्य विक्रीला परवानगी; ‘हे’ आहेत नियम

pune mahapalika
Last Modified मंगळवार, 1 जून 2021 (08:17 IST)
पुणे महापालिकेने मद्य विक्रीच्या दुकानांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पुणे पालिकेने हद्दीतील मद्य विक्रीची दुकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमाप्रमाणे होम डिलीव्हरी सुविधा सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत) सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

लॉकडाऊन संदर्भात पुणे महापालिकेकडून निर्बंधाबाबतचे आज सुधारित आदेश जारी करण्यात आले असून त्यामध्ये काही आस्थापनाच्या कर्मचार्‍यांना कोविड-19 टेस्टमधून सूट देण्यात आली आहे.


नवीन नियमावली

1. सर्व ऑक्सिजन प्रोडयूसर कंपन्यांनी 100 टक्के ऑक्सिजनचा पुरवठा हा फक्त वैद्यकीय कारणासाठी करावा. त्यांनी ऑक्सिजनचा वापर करणारे आणि ऑक्सिजन पुरवठा करणारे यांची यादी प्रसिध्द करावी.

2. पुणे मनपा क्षेत्रात
महाराष्ट्र शासनाने ज्या अत्यावश्यक सेवेशी संबंधित उत्पादन करणार्‍या कंपन्यांना परवानगी दिलेली आहे अशा कंपन्यांना आवश्यक मालाचा पुरवठा करणारी दुकाने केवळ त्याच कारणासाठी सुरू ठेवता येतील. त्यांना इतर किरकोळ विक्री करता येणारर नाही. त्यांनी पॉईंट टू पॉईंट विक्री करावी.

3. खाली आस्थापनावरील कर्मचार्‍यांना कोविड-19 (आरटीपीसीआर / आरएटी / ट्रूनॅट / सीबीएनएएटी) चाचणी करण्यापासून सूट देण्यात येत आहे.

अ. ई-कॉमर्स मार्फत घरपोच सुविधा देणारे कर्मचारी

ब. हॉटेल, बार, रेस्टॉरंट यांचे कर्मचारी तसेच त्यांचे मार्फत घरपोच सुविधा देणारे कर्मचारी

क. खाजगी वाहतूक करणारे वाहन चालक / मालक

ड. दैनिक वर्तमानपत्रे, नियतकालीन मासिके, साप्ताहिके इत्यादीची छपाई व वितरण करणारे कर्मचारी इ.घरगुती काम करणारे कामगार, वाहन चालक, स्वयंपाकी, ज्येष्ठ नागरिक आणि घरी आजारी असणार्‍या लोकांना सेवा
देण्यासाठी वैद्यकीय मदतनीस / नर्स.

ई.
त्यांनी भारत सरकारव्दारे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.

4. पुणे मनपा क्षेत्रातील खानावळी (मेस) या फक्त पार्सल सेवेसाठी सर्व दिवस सकाळी 7 ते सायंकाळी 8 या वेळेत सुरू राहतील.

5. पुणे मनपा क्षेत्रातील मद्य विक्रीची दुकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमाप्रमाणे होम डिलीव्हरी सुविधा – सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत सुरू राहील.

6. चष्म्याची दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहतील.

7. संदर्भीय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.

8. पुणे मनपाने यापुर्वी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

प्रॅक्टिकलच्या बहाण्याने 17 मुलींना नशा देऊन बलात्काराचा ...

प्रॅक्टिकलच्या बहाण्याने 17 मुलींना नशा देऊन बलात्काराचा प्रयत्न !
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील दोन खाजगी शाळांच्या व्यवस्थापकांवर 17 मुलींचे ...

तलवारीने केक कापला, बर्थडे बॉयला अटक

तलवारीने केक कापला, बर्थडे बॉयला अटक
वाढदिवसाचा केक चाकूऐवजी तलवारीने कापण्याची क्रेझ तरुणांना वाढत आहे. पण हा शौक बर्थडे बॉय ...

PUBG मोबाईल नंतर BGMI खेळत असाल तर 31 डिसेंबरपर्यंत हे ...

PUBG मोबाईल नंतर BGMI खेळत  असाल तर  31 डिसेंबरपर्यंत हे काम करा, नाहीतर होईल नुकसान
गेल्या वर्षी जेव्हा PUBG मोबाईल गेमवर बंदी घालण्यात आली होती, तेव्हा तो तरुणांमध्ये ...

पोटच्या 10 दिवसाच्या बाळाला 50 हजारासाठी विकलं

पोटच्या 10 दिवसाच्या बाळाला 50 हजारासाठी विकलं
मुंबई- पोटच्या 10 दिवसांच्या बाळाची विक्री करणाऱ्या आईला आणि चार दलालांना एनआरआय ...

विशाल गर्गः झूम मीटिंगमध्ये 900 जणांना नोकरीवरुन काढणारे ...

विशाल गर्गः झूम मीटिंगमध्ये 900 जणांना नोकरीवरुन काढणारे सीईओ कोण आहेत?
झूम मीटिंगच्या माध्यमातून 900 लोकांना कामावरून कमी करणारा अमेरिकेच्या कंपनीचा प्रमुख सोशल ...