पिंपरी-चिंचवड स्थायी समिती सभापतीपदी नितीन लांडगे विजयी, राष्ट्रवादीचा पराभव

congress landge
Last Modified शुक्रवार, 5 मार्च 2021 (16:14 IST)
पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक झाली. त्यात पाच विरुद्ध दहा मतांनी लांडगे विजयी झाले. पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक (दि. ५) झाली. भाजपचे नगरसेवक फोडून सत्तांतराचा ‘सांगली पॅटर्न‘ पिंपरी-चिंचवड महापालिकेतही घडविण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची घोषणा तूर्त तरी ‘फुसका बार‘ ठरली आहे. स्थायी समिती अध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी याबाबत प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना पिंपरी-चिंचवड महापालिकेत सांगली पॅटर्न घडविणार असल्याचा दावा केला होता, तथापि, स्थायी समिती अध्यक्ष निवडणुकीत सत्तारूढ भाजपचे अॅड. नितीन लांडगे हेच विजयी झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या दाव्यातील फोल
ठरला
आहे.

भाजपचे नाराज 12 ते 15 नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य वाघेरे यांनी केले होते. त्यातच भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रवी लांडगे यांना स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपने उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी महापौरांकडे स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा सादर केला. या पार्श्वभूमीवर भाजपमधील नाराजीचा फायदा मिळण्याची आशा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना वाटत होती. प्रत्यक्षात निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या घोषणा या निव्वळ वल्गना ठरल्याचे दिसून येत आहे.
भाजपचे नगरसेवक फोडून पिंपरी-चिंचवड महापालिकेतही सत्तांतर घडविण्याची व्यूहरचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आखली. त्यानुसार ऑपरेशन ‘सांगली पॅटर्न’ सुरू देखील झाले, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी त्याबाबत जाहीर वाच्यता केल्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते सावध झाले आणि राष्ट्रवादीचा कावा यशस्वी होण्यापूर्वीच भाजप नेत्यांनी त्यांच्या पद्धतीने ‘डॅमेज कंट्रोल’ केले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांकडून ‘लक्ष्य’ बनविले जात आहे.


यावर अधिक वाचा :

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभातबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी केली अटक…
अहमदनगर शहरात वाहनचालकांकडून लिफ्ट मागून नागरिकांना लुटणारी ‘ती’ भामटी महिला काही जागृत ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी
अहमदनगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध ...

अतिशय चिंताजनक! कोरोना संसर्गात नाशिक देशात पहिले; १० ...

अतिशय चिंताजनक! कोरोना संसर्गात नाशिक देशात पहिले; १० लाखांमागे सर्वाधिक बाधित
देशात कोरोना प्रादुर्भावाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसत आहे. सध्या राज्यात ६० ...

रेमडेसिवीरचा साठा जप्त करा; राज्य सरकारचे ‘एफडीए’ला आदेश

रेमडेसिवीरचा साठा जप्त करा; राज्य सरकारचे ‘एफडीए’ला आदेश
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोना लसीपासून ते ...

मुंबईत अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या गाड्यांसाठी ‘कलर कोड’, ...

मुंबईत अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या गाड्यांसाठी ‘कलर कोड’, नियम मोडणाऱ्यांना कठोर शिक्षा
मुंबईमध्ये अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या गाड्यांना कलर कोड दिला जाणार आहे. शासनाच्या नियमाचे ...

डॉ. हर्षवर्धन यांची उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा; ऑक्सिजनसह ...

डॉ. हर्षवर्धन यांची उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा; ऑक्सिजनसह सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासन
राज्य आणि केंद्र सरकार यांच्यात वाढत चाललेला तणाव कमी करण्यासाठी केंद्रीय ...

महाराष्ट्रात येणार तिसरी लाट, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ...

महाराष्ट्रात येणार तिसरी लाट, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे उद्योगांना आवाहन
कोविडचा झपाट्याने वाढता प्रादुर्भाव पाहता सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजनची नितांत गरज आहे, ...