मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 3 सप्टेंबर 2020 (15:38 IST)

पुणे महापालिकेचे माजी महापौर दत्तात्रय एकबोटे यांचे कोरोनामुळे निधन

पुणे महापालिकेचे माजी महापौर दत्तात्रय गोविंद तथा दत्ता एकबोटे (८४) यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. मध्यरात्री सव्वा बाराच्या दरम्यान त्यांनी ससून रुगणालयात अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली आणि नातू असा परिवार आहे. याआधी नुकतेच एकबोटे यांच्या ज्येष्ठ मुलीचे आणि तरुण मुलाचे कोरोनामुळे निधन झाले होते. 
 
एकबोटे यांनी अनेक रुग्णालयाशी संपर्क साधला. पण, त्यांना कुठेच जागा मिळाली नाही. अखेर त्यांना ससून रुग्णालयात दाखल व्हावे लागले. तिथेही त्यांना योग्य उपचार मिळाले नाहीत. दरम्यान, त्यांनी माजी नगरसेविका मीनाक्षी ज्ञानेश्वर काडगी यांनी गिरीश बापट, अजित पवार यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर सुविधा उपलब्ध झाल्या आणि गांभीर्याने उपचार केले गेले.