पुण्यात स्थिती गंभीर, PMC ने लष्कराकडे मागितली मदत

corona updates
Last Modified बुधवार, 7 एप्रिल 2021 (16:41 IST)
देशात कोरोना विषाणूची स्थिती भयावह होत चालली आहे. देशभरात दररोज एक लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची संख्या पोहचत असून त्यापैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून येत आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि नागपुरात कोरोना स्थिती अवाक्याबाहेर जाताना दिसत आहे. पुण्यात देखील स्थिती अत्यंत गंभीर असून कोरोना रुग्णांना उपचारासाठी बेड मिळणंही कठिण होत चाललं आहे. अशी स्थिती बघता पुणे महानगरपालिकेनं लष्कराकडे मदत मागितली आहे.
पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये कोरोनावरील रुग्णांवर उपचारासाठी पुजवळपास 21 हजारांहून अधिक बेड उपलब्ध करून देण्यात आले असले तरी यातील बहुतांशी बेडला व्हेंटिलेटरची सुविधा नाही. पुण्यात मोठ्या प्रमाणात आयसीयू आणि व्हेटिलेटर बेडचा तुटवडा जाणवत आहेत. पुण्यात 489 बेडला व्हेटिलेटरची सुविधा उपलब्ध आहे अशात मोठ्या प्रमाणात रुग्णांची वाढ होत असल्यामुळे हेळसांड होताना दिसत आहे.
पुण्यातील प्रायव्हेट आणि शासकीय रुग्णालयात मोठ्या प्रमाणात बेड आणि व्हेंटिलेटरची कमरता जाणवत असून अतिशय गंभीर दृश्य तयार होत आहे. यामुळे पीएमसीने भारतीय लष्कराकडे मदत मागितली आहे.

पुण्यात भारतीय लष्कराचं एक मोठं रुग्णालय असून यात 335 बेड आणि 15 व्हेंटीलेटरची अद्ययावत सुविधा आहे. पुणे महानगरपालिकेनं या ठिकाणी कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी मदत मागितली आहे.

यावर अधिक वाचा :

आता थेट बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

आता थेट बोगस डॉक्टरचा पर्दाफाश
पुण्याच्या शिरुर तालुक्यातील कारेगाव येथे एका बोगस डॉक्टराचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी ...

खासदार संजय राऊत यांनी ममता दीदींना पाठिंबा दर्शवला

खासदार संजय राऊत यांनी ममता दीदींना पाठिंबा दर्शवला
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल ...

लॉकडाऊनची अंमलबजावणी दोन दिवसांनी होईल

लॉकडाऊनची अंमलबजावणी दोन दिवसांनी होईल
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासठी 12 ते 13 दिवसांचा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे, ...

लॉकडाऊनचा निर्णय आजच होण्याची शक्यता : अस्लम शेख

लॉकडाऊनचा निर्णय आजच होण्याची शक्यता : अस्लम शेख
राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य ...

PNB महिलांना मोफत प्रशिक्षण देत आहे, दरमहा लाखो कमावू शकता, ...

PNB महिलांना मोफत प्रशिक्षण देत आहे, दरमहा लाखो कमावू शकता, कोण अर्ज करू शकेल?
पंजाब नॅशनल बँक महिला सक्षमीकरणासाठी अनेक सुविधा पुरवते. पुन्हा एकदा पीएनबीच्या मदतीने ...

'कोरोनाची साथ लवकर संपणार नाही' - WHO चे प्रमुख

'कोरोनाची साथ लवकर संपणार नाही' - WHO चे प्रमुख
"सार्वजनिक आरोग्यासाठी पावलं उचलून काही महिन्यांसाठी कोरोनाची साथीवर नियंत्रण मिळवता येऊ ...

कोलकाता-मुंबई यांच्यात आज चुरशीच्या लढतीची शक्यता

कोलकाता-मुंबई यांच्यात आज चुरशीच्या लढतीची शक्यता
आयपीएलमध्ये आज (मंगळवारी) पाचवेळचा विजेता असलेल्या मुंबई इंडियन्सचा सामना दोनवेळचा ...