1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 24 जून 2020 (09:19 IST)

मास्क न वापरणार्‍यांना 1000 रुपये दंड

पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिका आयुक्त आणि पोलिसांनी कठोर निर्णय घेतला आहे. येथे सार्वजनिक ठिकाणी किंवा प्रवास करताना मास्क वापरणं बंधनकारक आहे. विना मास्क कोणीही आढळल्यास त्याला दंड आकारण्यात येईल.
 
मास्क न लावता सार्वजिक ठिकाणी फिरणारे, सार्वजिक ठिकाणी उभे असणारे किंवा गाडीवरून प्रवास करणाऱ्या व्यक्तींना 500 ते 1000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. याशिवाय पान, गुटखा खाऊन किंवा त्याशिवायही सार्वजिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींना 500 ते 1000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. 
 
आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत तसंच अनुषांगिक अधिनियमान्वये कारवाई करण्यात येईल अशी सूचना देखील देण्यात आली आहे.