शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 27 ऑक्टोबर 2021 (10:33 IST)

पुण्यात दिवाळीसाठी नियमावली जाहीर, ध्वनी प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर बंदी

दिवाळीचा सण काही दिवसांवर येऊन ठिपला आहे. कोरोनाचा प्रादुर्भव सरत आहे. प्रकरणे देखील कमी आढळत आहे. दिवाळी सणा निमित्त पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाकडून  काही नियमावली जाहीर करण्यात आली आहे. पुण्यात विदेशी फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. नियमावली मध्ये तात्पुरते फटाके विक्रीसाठी परवाने देण्यात आले आहे. हे परवाने 27 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर पर्यंत मान्य असणार. मुदत संपल्यावर फटाके किंवा शोभेच्या फटाक्यांची विक्री करता येणार नाही. रस्त्यात किंवा रस्त्यापासून 10 मीटरच्या अंतराच्या आत कोणत्याही प्रकारचे फटाके किंवा रोषणाईचे फटाके चालविण्यास बंदी घातली आहे. नियमाचे उल्लंघन केल्यास  कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल. फटाक्यांच्या दुकानाच्या 50 मीटरच्या  परिसरात फटाके उडविण्यास बंदी घालण्यात आली आहे. ध्वनी प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर रात्री 10 ते 6 वाजे पर्यन्त बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई केली जाईल असे या नियमावलीत सांगण्यात आले आहे.