शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 7 नोव्हेंबर 2023 (19:32 IST)

धक्कादायक! पुण्यात साखळी बॉम्ब स्फोट घडवण्याचा कट, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

NIA Department
पुण्यात साखळी बॉम्ब स्फोट घडवून मोठा अपघात घडवण्याचा मोठा कट रचला जात असल्याची माहिती एनआयएच्या तपासातून समोर आल्याचे उघडकीस आले. या साखळीबॉम्बस्फोट घडवून आणायच्या सूचना सीरियामधून मिळत असल्याचे तपासात उघडकीस आले. पुणे इसिस मॉड्यूल या प्रकरणात महम्मद शाहनवाझ आलम रा. झारखंड याला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पुणेने अटक केली आहे. त्याने ही माहिती दिल्याचे समोर आले आहे. 

पुणे पोलिसांनी कोथरूड परिसरातून 19 जुलै 2023 रोजी महम्मद इम्रान खान आणि महम्मद युनूस साकी आणि शाहनवाज आलम याला दुचाकी चोरी करण्याचे प्रयत्न करताना अटक केली .मात्र घराची झडती घेताना शाहनवाज फरार झाला. त्याचा शोध पोलीस घेत होती. 

पुण्याच्या इसिस मॉड्यूल प्रकरणात अटक केलेल्या आरोपींशी शाहनवाज आलमचा संबंध होता. शाहनवाज ने पुण्यात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी विविध ठिकाणाची माहिती घेतली होती. असे तपासात उघड आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 





Edited by - Priya Dixit