बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. वायएसआर
Written By वार्ता|
Last Modified: अहमदनगर , शुक्रवार, 4 सप्टेंबर 2009 (09:27 IST)

साईबाबांचे भक्त होते डॉ. रेड्डी

आंध प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. वायएसआर रेड्‍डी यांचे हेलीकॉप्टर अपघातात निधन झाले. ते शिर्डीच्या साईबाबांचे भक्त होते.

शिर्डी येथील साईबाबा संस्थानातील एका अधिकारी यांनी सांगितले की, डॉ. रेड्डी यांनी सहकुटूंब साईबाबाचे दर्शन घेण्‍याची इच्छा व्यक्त केली होती. ते 11 ते 15 सप्टेंबर दरम्यान शिर्डी येथे येणार होती परंतु त्यांची ती इच्छा अपूर्णच राहिली.

साईबाबा दरबारात होणार्‍या आरतीचे टीव्हीवर सरळ प्रेक्षपण करण्‍यात यावे, अशीही डॉ. रेड्डी यांनी इच्छा व्यक्त केली होती. ही त्यांची इच्छा लवकरच पूर्ण केली जाणार आहे. टीव्ही 9 या खाजगी वृत्तवाहिनीकडून संस्थानाला तशी मंजूरी मिळाली आहे.

डॉ. रेड्डी यांनी महाराष्ट्रातून तिरुपती बालाजीला जाणार्‍या भक्तांसाठी तिरुमल्ला येथे भक्तिनिवासासाठी जमीन दिली आहे.