शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Updated :मुंबई , सोमवार, 19 सप्टेंबर 2016 (16:21 IST)

तर अँट्रॉसिटी कायदा रद्द करा : राज ठाकरे

अँट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत असून, हा कायदा रद्द केला पाहिजे. त्याऐवजी दुसरा कायदा आणला पाहिजे. धर्म व जातीनिहाय आरक्षण हवेच कशाला, आर्थिक निकषांवर आरक्षण दिले पाहिजे, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले.
 
कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना राज ठाकरे म्हणाले, कोपर्डी भेटीच्या वेळी गावकर्‍यांनी अँट्रॉसिटीच्या दुरुपयोगाच्या तक्रारी केल्या. या दुरुपयोगामुळेच या कायद्यात बदल झाला पाहिजे. हिंदू सणावर गदा येत आहे यावर कोण बोलणार?. दहीहंडीबाबत मी बोललो, तर माध्यमे लेख लिहून मला झोडपत राहिली. दहीहंडीला जे घाणेरडे स्वरूप आले, त्या नावाखाली धांगड¨धगा होतो त्याला लोक कंटाळले होते, आणि म्हणून लोक विरोधात बोलायला लागले.