गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

दूरदर्शन केंद्रात आग, एफएम रेडिओ सेवा बंद

मुंबईतील वरळी येथील दूरदर्शन केंद्रात आग लागली आहे. दूरदर्शन केंद्रामधील एफएम रेडिओच्या ट्रांसमिशन सेंटरला आग लागली आहे. आग लागल्यामुळे एफएम रेडिओचे प्रसारण बंद करण्यात आले आहे. सकाळी 8.16 मिनिटांनी आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी जाऊन आग नियंत्रणात आणली. आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
दरम्यान, मुंबईत सलग चार दिवसांपासून आगीच्या घटना सुरूच आहेत. सोमवारी अंधेरी येथील कामगार रुग्णालयाला लागलेल्या भीषण आगीनंतर, बुधवारी दुपारी माटुंगा लेबर कॅम्पमध्ये आग लागून 3 घरांचे नुकसान झाले होते. तर रात्री 11 च्या सुमारास नरिमन पॉइंट येथील ट्रायडेन्ट हॉटेलला आग लागली होती. त्यानंतर काही वेळातच माझगाव येथील अफजल हॉटेलमध्ये आग लागल्याची घटना घडली होती.