शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016 (11:27 IST)

18 नगरपंचायतींचे अध्यक्षपद आणि 233 नगर परिषदांच्या नगराध्यक्ष पदांची आरक्षण

महाराष्ट्र राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजला आहे. निवडणूक आयोगाने महत्वपूर्ण असलेल्या  18 नगरपंचायतींचे अध्यक्षपद आणि 233 नगर परिषदांच्या नगराध्यक्ष पदांची आरक्षण सोडत नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात काढण्यात आली.
 
अध्यक्ष पदासाठी सोडत काढण्यात आलेल्या 18 नगरपंचायतीपैकी अनुसूचित जातीसाठी 2, अनुसूचित जमातीसाठी 5, नागरिकांचा मागासप्रवर्गासाठी 6 तर खुला प्रवर्गासाठी 5 पदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले.
 नगराध्यक्ष पदासाठी सोडत काढण्यात आलेल्या 233 नगरपरिषदांपैकी अनुसूचित जातीसाठी 31, अनुसूचित जमातीसाठी 10, नागरिकांचा मागासप्रवर्गासाठी 63 तर खुला प्रवर्गासाठी 129 पदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले.
 
अनुसूचित जाती प्रवर्ग – शेंदूरजना घाट, जामखेड, दुधनी, उमरखेड, पलूस, चाकण, पाचोरा, बसमत, दारव्हा, सिल्लोड, कारंजा (जि. वाशिम),  सासवड, मानवत, तासगाव, इचलकरंजी, तर (महिला) महाबळेश्वर,  अंबड,  चाळीसगांव,  शेवगांव,  वाई,  साकोली,  खामगाव, लोणार, पाथरी, खोपोली, पातूर, जयसिंगपूर, आळंदी, सिंदी रेल्वे, नांदुरा, कराड.
 
अनुसूचित जमाती प्रवर्ग -चिमूर, नागभीड, सिंदखेडराजा, सिन्नर, देवळी तर (महिला)- गडचांदूर, यावल, आर्णी, चांदवड, फैजपूर.
 
नागरीकांचा मागास प्रवर्ग– राजगुरुनगर, नांदगांव, चांदूर रेल्वे, अलिबाग, बार्शी, मुरगुड, तळोदे, भंडारा, लोहा, किनवट, चांदूर बाजार, खेड, कळमनुरी. (महिला) -जत,  जेजुरी,  मंगळवेढे, उरण, पन्हाळा, चिखली, रिसोड, आष्टा, तळेगांव दाभाडे,  पुसद,  सावनेर,  कुंदलवाडी,  भूम, पूर्णा,  गडचिरोली, अहमदपूर, पवनी, कन्नड, मुरुम, जळगांव जामोद, अचलपूर, कळंब, परळी वैजनाथ, पेठ उमरी,  हादगांव,  धर्माबाद, फलटण,  किल्लेधारुर, गेवराई, राजापूर, पैठण, म्हसवड, बारामती, रहिमतपूर, वडगांव, मलकापूर (कोल्हापूर),  राहूरी, मेहकर, पारोळा, एरंडोल, अंबरनाथ, वेंगुर्ला, भडगांव, निलंगा, आर्वी, मुदखेड, बुलडाणा, कागल, उमरगा, जामनेर.
खुला प्रवर्ग-
करमाळा,  सांगोले,  पंढरपूर,  वर्धा,  हिंगणघाट, देवळी,  वाशिम, वणी.(महिला) – चिपळूण,  सातारा,  मुर्तिजापूर, आंबेजोगाई,  मनमाड,  खापा,  लोणावळा,  पांढरकवडा,  दौंड,  विटा,  शिरुर,  मोर्शी, अक्कलकोट, चोपडा, सोनपेठ, कन्हान पिंपरी, राहता पिंपळस,  कळमेश्वर,  भोर,  नवापूर,  कर्जत,  काटोल, अंमळनेर, नळदुर्ग, मंगळूरपीर, दिग्रस, नेर नबाबपूर, मुरुड-जंजीरा, देऊळगांव राजा,  माथेरान,  जिंतूर,  बदलापूर,  कंधार,  मोहपा,  घाटंजी,  श्रीगोंदा,  देसाईगंज,  इंदापूर,  ब्रम्हपूरी,  भगूर,  मैंदर्गी, चिखलदरा,  मूल,  तिरोडा, तेल्हारा, पालघर, भोकरदन, शेगांव,  महाड, सांगोले, वैजापूर, तुळजापूर,  बिलोली, उमरेड, यवतमाळ, श्रीरामपूर, भोकर, शिरपुर वरवाडे, पुलगांव, जालना, मोहोळ,  परतुर, गंगापूर, वरुड, सावदा.
 
कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, संगमनेर, अकोट, बाळापूर, दर्यापूर बानोसा, धामणगाव रेल्वे,  अंजनगाव,  खुलताबाद, माजलगाव, बीड , तुमसर, मलकापूर (बुलडाणा), बल्लारपूर, भद्रावती, गड्डूर, राजुरा, वरोरा, दोंडाईचा – वरवाडे,  गोंदिया, हिंगोली,  भुसावळ, वरणगाव, रावेर, धरणगाव,  गडहिंग्लज,  कुरुंदवाड,  उदगीर,  औसा,  कामठी, वाडी  (सीटी), रामटेक, नरखेड, मोवाड,  मुखेड,देगलूर,नंदुरबार ,शहादा, इगतपुरी , येवला, , सटाणा,  त्र्यंबक, उस्मानाबाद, परांडा, जव्हार, डहाणू, गंगाखेड, शैलू, जुन्नर, पेण, श्रीवर्धन, रोहा अष्टमी , रत्नागिरी,  इस्लामपूर, पाचगणी,  सावंतवाडी,  मालवण,  कुर्डवाडी.