सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018 (09:26 IST)

लहान बालिकेने १० रुपयांचा कॉईन, दुर्दैवी मृत्यू

हळहळ वाटेल असा  दुर्दैवी प्रकार घडला आहे. एका चार वर्षीय मुलीने १० रु. नाणे गिळले त्यात तिच्यावर उपचार सुरु असतांना तिचा मृत्यू झाला आहे. नाशिकच्या शिंदे पळसे येथील चांदगिरी गावात घडली आहे.मयत मुलीचे नाव  शालिनी हांडगे अस आहे.नाशिक जिल्ह्यातील शिंदे पळसेजवळील चांदगिरी गावात राहणाऱ्या शालिनीने  काल रविवार दुपारी खेळता-खेळता दहा रुपयाचं नाणं गिळलं होत. मात्र या नंतर रात्री नेहमी प्रमाणे शालिनी झोपी गेली होती. मात्र तिला रात्री श्वसनाचा मोठा त्रास होऊ लागला होता. त्यामुळे तिला लगेच जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल होते.

 तेव्हा तिने  त्यावेळी तिने नाणं गिळल्याचं उघड झाले होते.शालिनीवर रुग्णालयात उपचारही सुरु करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला. पण उपचारात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला आहे. मात्र पालकांनी वेळीच काळजी घेतली असती तर हा दुर्दैवी प्रकार घडला नसता. एका चुकीमुळे निर्दोष मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे.