1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 जानेवारी 2024 (15:34 IST)

16 वर्षीय भावाकडून 7 वर्षाच्या चुलत भावाची हत्या

child death
अकोला जिल्ह्यात पिंजर गावातून बेपत्ता 7 वर्षीय चिमुकला अफ्फान आयुब बागवान चा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला असून त्याच्या अपहरणाची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. पोलिसांनी त्याचा शोध लावला असून गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक पिंजर मध्ये शोध घेत असताना त्यांना चिमुकल्याचा मृतदेह आढळला. मृतदेहाचे शव विच्छेदन झाल्यावर त्याचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले.

सुरुवातीला शोध लावताना पोलिसांना घात पात केल्याचा संशय होता मात्र तांत्रिक पुरावे गोळा करत असताना पोलिसांना मयत मुलाच्या चुलत भावावर संशय आले. सुरुवातीला आरोपी भावाने दिशाभूल केली मात्र नंतर त्याने खून केल्याची कबुली दिली. 

आरोपीने गैरसमजातून भावाचे खून केले. झाले असे की 19 डिसेंबर रोजी मयत  अफ्फान आणि त्याचा चुलत भाऊ शेतात जवळ असलेल्या एका बंद खोलीत कबुतर पकडायला गेले असता ते दोघे खिडकीतून बंद खोलीच्या आत शिरले. मयत अफ्फान ला भावाने खिडकी जवळ पोतं धरून बसवलं आणि स्वतः खोलीत आत जाऊन कबुतर हाकलू लागला. कबुतर उडाले. मुद्दाम अफ्फान ने कबुतर सोडले असा गैसमज आरोपी ने केला आणि रागाच्या भरात येऊन त्याने चिमुकला अफ्फानचा गळा अवलूं त्याचा खून केला आणि त्याला विहिरीत ढकलून दिले. पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे . 
 
Edited by - Priya Dixit