वडिलांनी 16 महिन्यांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून गळा आवळून खून केला

kid mobile
Last Modified शुक्रवार, 7 जानेवारी 2022 (18:00 IST)
आपल्या 16 महिन्यांच्या मुलीचा मृतदेह घेऊन प्रवास करणाऱ्या एका जोडप्याला सोलापूर, महाराष्ट्रातील रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, रेल्वे पोलिसांनी गुरुवारी दोघांना मुलीच्या मृतदेहासह सोलापूर स्थानकावर गुजरातकडे जाणाऱ्या ट्रेनमधून अटक केली. आरोपी तेलंगणातील सिकंदराबाद शहरातून राजकोटला जाणाऱ्या ट्रेनमध्ये मृतदेहाची त्यांच्या गावी विल्हेवाट लावण्यासाठी निघाले होते. मुलीवर आधी तिच्या वडिलांनी लैंगिक शोषण केले आणि नंतर गळा आवळू

खून केल्याचेही सांगितले जात आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, मुलीच्या 26 वर्षीय वडिलांनी 3 जानेवारी रोजी सिकंदराबाद येथील त्याच्या राहत्या घरी चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा गळा आवळून खून केला होता. मुलीच्या आईचा या कृत्यात सहभाग असल्याचा आरोप आहे. बराच वेळ मुलीची हालचाल होत नसल्याने ट्रेनमधील काही प्रवाशांना या जोडप्यावर संशय आला, असे अधिकाऱ्याने सांगितले.
अतिरिक्त पोलिस अधीक्षक रेल्वे पोलिस यांनी सांगितले की, सहप्रवाशांनी ट्रेनमधील तिकीट कलेक्टरला याची माहिती दिली आणि नंतर सोलापूर स्थानकावरील रेल्वे पोलिसांनाही सतर्क करण्यात आले. दोघांना सोलापूर रेल्वे स्थानकावर थांबविण्यात
आल्याचे त्यांनी सांगितले. वैद्यकीय तपासणीनंतर मुलीचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिची गळा आवळून हत्या केल्याचीही माहिती मिळाली आहे. या गुन्ह्यात आईनेही त्याला मदत केली होती.
ते म्हणाले की, कुटुंब त्यांच्या मूळ जागी मृतदेहाची विल्हेवाट लावू इच्छित असल्याने प्रकरण दडपण्यासाठी राजकोटला जाणार्‍या ट्रेनमध्ये चढले. सोलापूर रेल्वे पोलिस ठाण्यात या जोडप्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दोघांनाही अटक करण्यात आली आहे


यावर अधिक वाचा :

आता अक्षय तृतीयेला महाआरती; राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश

आता अक्षय तृतीयेला महाआरती; राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मे रोजी दिलेल्या भोंग्याविषयीच्या अल्टिमेटने राजकारण ...

महाराष्ट्रात होणार महाआरती की महाभारत? 3 मे साठी मनसेची ...

महाराष्ट्रात होणार महाआरती की महाभारत? 3 मे साठी मनसेची मोठी घोषणा
मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवण्याचा इशारा दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यात 'महा ...

COVID-19 :कोविड-19 मुळे चीन राष्ट्रीय संकटाकडे वाटचाल करत ...

COVID-19 :कोविड-19 मुळे चीन राष्ट्रीय संकटाकडे वाटचाल करत आहे
चीनमध्ये कडक नियम असूनही कोरोना नियंत्रण होत नाही. नॅशनल हेल्थ कमिशनने मंगळवारी सांगितले ...

Vadapav Price Hike : महागाईमुळे मुंबईचा वडापाव महागला

Vadapav Price Hike : महागाईमुळे मुंबईचा वडापाव महागला
सध्या महागाई वाढतच आहे. रशिया -युक्रेन युद्धाचे परिणाम त्या देशालाच नाही तर इतर देशांनाही ...

EPFO मध्ये पगार मर्यादा 15 हजारांवरून 21 हजार रुपये ...

EPFO मध्ये पगार मर्यादा 15 हजारांवरून 21 हजार रुपये करण्याचा विचार, करोडो कर्मचाऱ्यांना होणार फायदा
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) शी संबंधित एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. ...

महाविकास आघाडी सरकारमधून काँग्रेस बाहेर पडणार? नाना पटोले ...

महाविकास आघाडी सरकारमधून काँग्रेस बाहेर पडणार? नाना पटोले म्हणाले….
राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधून काँग्रेस बाहेर पडणार का, यासंदर्भात ...

दर्ग्याच्या दरवाजाला भगवा रंग देणार्‍यास पोलिसांनी ठोकल्या ...

दर्ग्याच्या दरवाजाला भगवा रंग देणार्‍यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पीर बाबा दर्ग्याच्या ग्रीलच्या दरवाजाला भगवा रंग देऊन त्यामागे नाथांचा फोटो लावल्याची ...

राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज; हवामान ...

राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज; हवामान विभागाकडून यलो अलर्ट
देशात सर्वत्र सूर्यनारायण आग ओकत असताना दिलासादायक वृत्त आले आहे. हवामान विभागाच्या ...

तथागत गौतम बुद्धांनी दिलेले विचारच मानव जीवन प्रकाशमय करत ...

तथागत गौतम बुद्धांनी दिलेले विचारच मानव जीवन प्रकाशमय करत राहतील – उपमुख्यमंत्री अजित पवार
गौतम बुद्धांनी दया, क्षमा, शांती, त्याग, सेवा, समर्पणाचा संदेश देऊन आदर्श जीवनाचा मार्ग ...

चोर आले 15 एकर ऊस पिंजून काढल्यावर पोलिसांना समजल की,...

चोर आले  15 एकर ऊस पिंजून काढल्यावर पोलिसांना समजल की,...
हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील चिखली गावात काही दिवसांपूर्वी चोरीची घटना घडली होती. ...