मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : रविवार, 2 जून 2024 (11:51 IST)

दक्षिण मुंबईतील भायखळा परिसरातील 57 मजली इमारतीत आग

fire
दक्षिण मुंबईतील भायखळा परिसरात एका 57 मजली इमारतीला मध्यरात्री भीषण आग लागली. घटनेची माहिती तातडीनं अग्निशमन दल आणि पोलिसांना देण्यात आली असून त्यांनी तातडीनं धाव घेत अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. 

सदर घटना 11:42 वाजता भायखळ्यातील खटाव मिल कंपाउंड मध्ये घडली. या इमारतीच्या मॉन्टे साऊथ बिल्डिंगच्या ए विंगच्या 10 व्या मजल्यावरील फ्लॅट मध्ये आग लागली. 

या आगीमुळे इमारतीत राहणाऱ्या लोकांमध्ये घबराहट पसरली. इमारतीत धुराचे लोट पसरले.आगीवर अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने आग विझवण्याचे प्रयत्न सुरु केले. सुदैवाने आग इतर फ्लॅट पर्यंत पसरली नाही. आणि कोणतीही जीवित हानी झाली नाही. अग्निशमन दलाचे नऊ बंब घटनास्थळी उपस्थित होते. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. प्राथमिक तपासणीत आगीचे कारण शॉर्ट सर्किट असू शकते. 

Edited by - Priya Dixit