सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 23 जून 2024 (16:35 IST)

शिकाऊ कार चालकाच्या चुकीने एका महिलेचा मृत्यू , घटना सीसीटीव्ही मध्ये कैद

कांदिवलीतील पोईसर भागात एक हृदयद्रावक अपघात घडला आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. 21 जून रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास कांदिवलीच्या पोईसर भागात एका शिकाऊ कार चालकाने कार चालवताना ब्रेकएवजी एक्सिलेटरवर पाय दिला आणि कार वरील त्याचे नियंत्रण सुटून कार वेगाने पुढे वाढली आणि महिलेसह तिघांना धडकली. या अपघातात तिघे जखमी झाले असून महिलेचा मृत्यू झाला. 

हा अपघात सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यावर घटनास्थळी पोहोचून कार चालक आणि कार मालकाला अटक केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे. 

वाहनचालकाच्या चुकीमुळे इतर लोकांना जीव गमवावा लागला असताना महाराष्ट्रातून असे अनेक व्हिडिओ यापूर्वीही समोर आले आहेत. अलीकडेच पुण्यात घडलेल्या कार अपघाताची बरीच चर्चा झाली होती. या प्रकरणी अल्पवयीन चालकासह त्याचे वडील आणि आजोबा यांनाही अटक करण्यात आली आहे

Edited by - Priya Dixit