शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 27 ऑक्टोबर 2022 (21:08 IST)

आदित्य ठाकरे यांनी येथे अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणी केली

Aditya Thackeray
माजी मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सिन्नर तालुक्यातील सोनारी येथे अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जात पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी आ. राजाभाऊ वाजे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर हे उपस्थितीत होते.
 
आदित्य ठाकरेंचा नाशिक आणि पुणे जिल्ह्यात दौरा असून दुपारी १२ वाजता ते सिन्नर येथे आले. त्यानंतर त्यांनी पाहणी करुन पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, ओला दुष्काळ जाहीर करावा व सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी ही मागणी त्यांनी केली.  मी पर्यावरण मंत्री होतो मला माहित आहे, वातावरण बदल मुळे अतिवृष्टी आणि अशी संकटे उभे राहतात. अन्नदाता म्हणून त्यांचे नुकसान होत आहे. आपत्ती येत असते संकट येत असते त्याला तोंड देणं महत्वाचे आहे. पण, हे सरकार काम करत नाही असे निदर्शनात येत आहे. लोकांना जस कृषी मंत्री माहीत नाही तसे आम्हाला मुख्यमंत्री माहीत नाही ते आम्हाला दिसत नाही असा चिमटाही त्यांनी यावेळी काढला. लोकांचा आवाज ऐकणे गरजेचे पण, हे सरकार फक्त राजकारणात व्यस्त आहे. अन्नदात्याची किमंत त्यांना कळायला पाहिजे. प्रशासनाने प्रस्ताव पाठवला आहे पण अजून पैसे आलेले नाही. पंचनामे अजून झालेले नाही. जिथे झाले आहे तिथे मदत करावी असेही त्यांनी सांगितले.शेतकरी बांधवांचा धीर सुटत चालला आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. शेतकरी बांधव संकटात कायम उभा असतो आपल्याला त्यांच्यासाठी उभे राहावे लागेल. यावेळी ते म्हणाले मी महाराष्ट्र भर दौरा करणार, जिथे शेतक-यांना गरज तेथे उभे राहणार. उध्दव साहेब आणि मी फिरतो आहे म्हणून त्यांना दाखवावं लागत आहे.
 
समृध्दीच्या कामावर टीका
समृध्दी महामार्गाचे काम चांगले झाले नाही. ज्यांच्या हातात काम होते त्यांनी काही केलं नाही. गावोगावी रस्त्यांचा एक्सेस नाही.रस्त्याचा प्रश्न सोडवावा, राजकारण बाजूला ठेऊन एकत्र यावे. आम्ही सोबत आहोत. खांद्याला खांदा लावून उभे राहू राजकारण बाजूला ठेऊ असेही त्यांनी सांगितले.

Edited by : Ratnadeep Ranshoor