शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 25 जानेवारी 2022 (09:56 IST)

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा क्रांतिचौकात बसविण्यात आला

राज्यातील औरंगाबाद मधील क्रांती चौकात अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा अश्वारूढ पुतळा बसविण्यात यश आले आहे. या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आले. 
शिवरायांचा हा अश्वारूढ पुतळा बसविण्यात तांत्रिक अडचणी येत होत्या. रात्री 10 आहे पासून हा पुतळा बसविण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र हा पुतळा बसविण्यात काही तांत्रिक अडचणी येत होत्या. पुतळा बसविण्यात वापरण्यात आलेल्या क्रेनला बदलून हा पुतळा बसविण्याचा प्रयत्नात पहाटे 5 वाजता यश आले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भव्य अश्वारूढ पुतळा तयार करण्याचं काम पुण्यात सुरु होत. 25 फूट उंच आणि 8 टन वजनी असलेल्या हा पुतळा तयार झाल्यावर शुक्रवारी हा पुतळा पुण्यातून एका मोठ्या ट्रेलर मध्ये औरंगाबाद कडे निघाला. अखेर आज पहाटे हा पुतळा औरंगाबाद मधील क्रांती चौकात बसविण्यात आला. शहरातील मुख्य मार्ग असलेल्या क्रांती चौकात वाहतूक कोंडी होऊ नये या साठी उड्डाणपूल बांधण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात मोठा अश्वारूढ पुतळा औरंगाबादच्या क्रांती चौकात विराजमान झाला .