सत्यनारायण पूजेला गेले की चौकशीला राज ठाकरेंवर जहरी टीका
सध्या राज ठाकरे यांचा ई डी तर्फे चौकशी हा विषय राज्यात गाजतो आहे. सर्व माध्यमे आणि राजकारणी राज यांच्या बद्दल चर्चा करत आहेत तर काही त्यांच्यावर टीका करत आहेत.
ईडीने नोटीस बजावली त्यानुसार आज राज ठाकरे आज (22 ऑगस्ट) ईडीच्या चौकशीला सामोरे गेले आहेत. मात्र राज यांच्या ईडी चौकशीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जोरदार टीका केली आहे. राज ठाकरे सहकुटुंब ईडीच्या चौकशीला निघालेत की सत्यनारायणाच्या पूजेला? अशी टीका अंजली दमानिया यांनी केली आहे.
आज सकाळी राज ठाकरे सकाळी 10.30 च्या सुमारास कृष्णकुंज निवासस्थानातून ईडी कार्यालयासाठी रवाना झाले होते त्यावेळी सोबत पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगी उर्वशी ठाकरे, मुलगा अमित ठाकरे आणि सून मिताली ठाकरे-बोरुडे हेही ईडी कार्यालयात गेले आहेत. यावरुनच अंजली दमानिया यांनी ट्विटरच्या माध्यमातून राज ठाकरेंवर जहरी टीका केली.