शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 4 जानेवारी 2023 (07:51 IST)

सहा वर्षाच्या चिमुरड्याला मेंदूचा आजार ; शस्त्रक्रियेसाठी दोन लाखाची गरज

सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील आणि सध्या मुंबईस्थित प्रज्ञेश प्रवीण परबया सहा वर्षाच्या चिमुरड्याला मेंदूचा आजार झाला आहे. आतापर्यंत त्याच्यावर लाखो रूपये खर्च करण्यात आले आहे. मात्र आता पुढील तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी सुमारे २ लाख खर्च आहे. प्रज्ञेश वडील प्रवीण मुंबईत बोरिवली पूर्व येथे राहत असून
खाजगी कंपनीत कामाला आहेत. त्यांच्या पगारातुन कुटुंबाचा खर्च कसाबसा भागतो. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे.
 
अशा परिस्थितीत प्रज्ञेशचा आजार आणि त्यावरील खर्च ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. प्रज्ञेशच्या आतापर्यंतच्या उपचारासाठी त्यांनी आपल्याकडील होते नव्हते ते सर्व संपवले आहे. त्यामुळे समाजातील स्वयंसेवी संस्था व दानशूर व्यक्तींनी मदत केल्यास प्रज्ञेशवर पुढील उपचार होणार आहे.
गेल्या महिन्यात प्रज्ञेशला अचानक त्रास होऊ लागल्यानंतर उपचारादरम्यान त्याच्या मेंदूत पाणी झाल्याचे निदान झाले आणि तिच्या आई वडिलांना धक्काच बसला. प्रज्ञेशच्या शस्त्रक्रियेवरील खर्च त्यांना परवडणारा नव्हता. तरीही स्वतः कडची सर्व मिळकत गोळा करून व मित्र परीवारच्या सहकार्याने प्राथमिक खर्च करण्यात आला. आता प्रज्ञेशच्या मेंदूवर तातडीची शस्त्रक्रिया करण्यासाठी दोन लाखाची गरज आहे. प्रज्ञेश सध्या मुंबईत वाडिया हॉस्पिटलमध्ये आय सी यू मध्ये उपचार घेत आहे. त्यामुळे समाजातील सर्व दात्यांनी पुढे येणे गरजेचे आहे. त्यासाठी खालील गूगल पे अथवा बँक खात्यावर जमेल तशी मदत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गुगल पे नंबर 9867755539
 
नाव प्रविण गोविंद परब
बँक आयसीआयसीआय खाते क्र 104401506001
आयएफएससी कोड ICIC0001044

Edited by : Ratnadeep Ranshoor