गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 25 जुलै 2022 (08:10 IST)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ३० जूलैला नाशिक दौ-यावर; माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती

eknath shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ३० जूलै रोजी नाशिक व औरंगाबाद दौ-यावर येणार असल्याची माहिती माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. ते औरंगाबाद येथील दौ-यासाठी विनंती करण्यासाठी गेले होते. यावेळेस त्यांना नाशिकच्या दौ-याची माहिती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तीन दिवसापूर्वी शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांचा नाशिक, औरंगाबाद दौरा झाला. त्यामुळे शिंदे यांच्या या दौ-याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नाशिक जिल्ह्यातून खा. हेमंत गोडसे, मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघाचे आमदार दादा भुसे व नांदगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार सुहास कांदे यांनी बंडखोरी करुन शिंदे गटात सामील झाले आहे. त्यामुळे या दौ-यात मोठे शक्तीप्रदर्शन सुध्दा करण्यात येणार आहे.