शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 15 सप्टेंबर 2020 (09:37 IST)

एक आदर्श : योद्ध्याच्या चितेला मनपा आयुक्तांनी दिला अग्नी

सांगलीमध्ये महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी आपल्या एका कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या चितेला स्वतःला अग्नी दिला.  
 
या घटनेमध्ये मिरजेत कोरोना रूग्णांच्या चितेला अग्नी देणाऱ्या महापालिकेच्या एका स्वच्छता निरीक्षकाला कोरोनाची बाधा झाली. सुधीर कांबळे असं त्यांच नाव. गेल्या 3 महिन्यापासून कांबळे हे मिरज-पंढरपूर रोडवरील स्मशान भूमीत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या अंत्यसंस्काराचा काम करत होते. जवळपास 300 हून अधिक कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्यावर कांबळे आणि त्यांच्या टीमने अंत्यसंस्कार करण्याबरोबर चितेला अग्नी देण्याचे काम केलं. काही दिवसांपूर्वी कांबळे यांना हे काम करताना कोरोना लागण झाली आणि त्यात त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 
 
कोरोना योद्धा म्हणून कोरोना रुग्णांच्यावर अंत्यसंस्कार करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचा मृत्यू कापडणीस यांना जिव्हारी लागला. या परिस्थितीमध्ये आयुक्त नितीन कापडणीस यांनी त्यांच्या चितेला अग्नी दिली.