शुक्रवार, 16 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017 (17:35 IST)

मुख्यमंत्री महाराष्ट्रातच राहणार : गडकरी

devendra fanavis

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातच राहणार असल्याचे संकेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. राज्याला त्यांच्या नेतृत्वाची गरज असल्याचे सांगून त्यांनी फडणवीस दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. नागपूर येथील निवासस्थानी ते बोलत होते. 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रात चांगले काम केले आहे. केंद्रातही चांगले काम करण्याची त्यांची योग्यता आहे. पण राज्यातील अनेक आव्हाने आणि समस्या पाहता राज्याला त्यांच्या नेतृत्वाची आवश्यकता आहे, असे गडकरी म्हणाले.फडणवीस यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. पण दिल्लीतून बोलावणे येत नाही, तोपर्यंत मीच मुख्यमंत्री राहणार असे सांगून मुख्यमंत्र्यांनी स्वतः या चर्चेला पूर्णविराम दिला होता.