रेमडेसिव्हीर व टॉसीलीझुमॅब मेडिकलमधून थेट वितरण होणार…
टॉसीलीझुमॅब व रेमडेसिव्हीर या औषधांचे सुरूवातीला जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून वितरण करण्यात येत होते. परंतू आता टॉसीलीझुमॅब व रेमडेसिव्हीर ही औषधे थेट डॉक्टरांच्या सल्ल्याने तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या नियंत्रणाखाली थेट मेडिकलमध्ये वितरणासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ही औषधे माफक दरात नागरिकांना उपलब्ध करून देण्यात यावी, अशा सूचनाही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थितीची माहिती देताना सांगितले की, जिल्ह्यातील लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यासाठी एका दिवसात एक लाख लसीकरण करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्ह्यात प्रशासनामार्फत आवश्यक पूर्व तयारी करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी यावेळी सांगितले.बैठकीत महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कोरोनाच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीची माहिती पालकमंत्री यांना सादर केली.