कुंभी मध्यम प्रकल्पातून विसर्ग वाढणार; कुंभी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
गगनबावडा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. कुंभी मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरु आहे. पावसाचा वाढता जोर लक्षात घेऊन गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास वक्रद्वारातून 200 क्यूसेक्स ची वाढ करून एकूण 1150 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सोडणेत येत आहे. त्यामुळे कुंभी नदिच्या काठावरिल गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, जलाशय परीचलन सूचीनुसार पाणीपातळी नियंत्रित करणेकरिता वक्रद्वारातून 650 क्यूसेक्स व विद्युतनिर्मितीगृहातून 300 क्यूसेक्स असा एकूण 950 क्यूसेक्स विसर्ग सुरू होता. पावसाचा वाढता जोर लक्षात घेऊन गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास वक्रद्वारातून 200 क्यूसेक्स ची वाढ करून एकूण 1150 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सोडणेत येत आहे. येथील कोदे, वेसरप, अणदूर येथील धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे नदीपात्रातील पाणीपातळीमध्ये कमालीची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाटबंधारे विभाग, कुंभी धरण प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Edited By - Ratnadeep ranshoor