गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 15 जुलै 2024 (09:38 IST)

MLC निवडणुकीनंतर BJP कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, पंकजा मुंडेंना दर्शविले भावी उपमुख्यमंत्री; लावले पोस्टर

pankaja munde
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यामध्ये पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी पोस्टर लावले आहे. या पोस्टर्स मध्ये पंकजा मुंडे यांना भावी उपमुख्यमंत्री दर्शवले  आहे. सध्या झालेल्या एमएलसी निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांनी यश मिळवले. 
 
बीड: महाराष्ट्रात झालेल्या एमएलसी निवडणुकीनंतर आत भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहवयास मिळत आहे. महायुतीचे सर्व उमेदवार जिंकले आहे. तर पंकजा मुंडे यांच्या समर्थकांमध्ये खूप उत्साह पाहावयास मिळत आहे.   
 
बीड मध्ये त्यांच्या समर्थकांनी पोस्टर्स लावले आहे. या पोस्टर्स मध्ये पंकजा मुंडे यांना राज्याच्या भावी उपमुख्यमंत्री म्हणून दर्शविले आहे. लवकरच शिंदे सरकार यांचे कॅबिनेट विस्तार होणार आहे. अशामध्ये  समर्थक पंकजा मुंडे यांना भावी उपमुख्यमंत्री म्हणून दर्शवत आहे.  
 
तसेच भाजपच्या राष्ट्रीय महासचिव पंकजा मुंडे 2019 मध्ये राज्य विधानसभा निवडणूक हरल्या होत्या.  व काही दिवसांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये बीड मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राकांपा (शरदचंद्र पवार) यांच्या बजरंग सोनवणे यांकडून त्यांना अपयश आले.  तर या वेळेस झालेल्या एमएलसी निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांना यश मिळाले आहे.