गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 नोव्हेंबर 2021 (13:15 IST)

खळबळजनक ! पंधरा एकर ऊस जळाला, मंदाणे येथील घटना

मंदाणे येथे शिवारात गुरुवारी 15 एकर ऊसाच्या शेतात आग लागून सुमारे 15 एकर ऊस जळून खाक झाला आहे. या आगीमुळे सुमारे 8 ते 10 लाखांचे नुकसान झाले आहे. वडगाव रस्त्यालगत गुलाबराव मोरे आणि किशोर मोरे यांनी या 15 एकर भागात उसाची लागवड केली होती. या शेतात अचानक आग लागली. वारा असल्यामुळे या आगीने भयंकर रूप घेतले आणि संपूर्ण ऊस  जळून खाक झाला. आगीची माहिती मिळतातच गावकरी आणि मोरे घटनास्थळी पोहोचले.त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. पानसेमल व शहादा पालिकेचे अग्निशमनदलाचे बंब ही  घटनास्थळी पोहोचले आणि बऱ्याच परिश्रमानंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.पंचनाम्याचा अहवाल तहसील कार्यालयात सादर करण्यात आला आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही .