शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 जानेवारी 2021 (08:54 IST)

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून सुरूवात करण्यात आली. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ४ जानेवारी होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्ज भरण्यात येणारी अडचणी लक्षात घेता हे अर्ज भरण्यास १८ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे राज्य मंडळातर्फे जाहीर करण्यात आले आहे.
 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२१ मध्ये घेण्यात येणार्‍या बारावी परीक्षेच्या नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज सरल डेटाबेसवरून ऑनलाईन पद्धतीने भरण्यास १५ डिसेंबरपासून सुरूवात झाली. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे यासारख्या शहरातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालये अद्याप सुरू झालेली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात अर्ज भरण्यासाठी १८ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य मंडळाकडून जाहीर करण्यात आला आहे. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत. विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्यानंतर कॉलेजमधील जनरल रजिस्टरशी माहिती पडताळून खात्री करून घ्यावी, त्यानंतरच अर्ज सादर करण्यात यावा, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी परिपत्रकाद्वारे केले आहे.