गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 24 ऑगस्ट 2022 (15:33 IST)

या तारखेपासून शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत; राज्य सरकारची घोषणा

devendra fadnavis
राज्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना नक्की कधीपासून आर्थिक मदत मिळेल या प्रश्नावरुन विरोधकांनी सत्ताधारी राज्य सरकारला आज चांगलेच धारेवर धरले. याप्रश्नी विधानसभेत गदारोळ झाला. अखेर याची दखल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना घ्यावी लागली. येत्या १५ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.