गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 18 सप्टेंबर 2017 (09:36 IST)

हे सरकार कफल्लक आहे : अ‍ॅड. श्रीहरी अणे

‘अच्छे दिन’ आणायचे असेल तर पैसे लागतात, पण महाराष्ट्र सरकारची तिजोरी खालीआहे. हे कफल्लक सरकार आहे, त्यांच्या खिशाला भोकं पडली आहेत, अशी टीका महाराष्ट्राचे माजी अधिवक्ता आणि ज्येष्ठ विदर्भवादी नेते अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी येथे केली.विदर्भ राज्य आघाडीतर्फे वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी १ मे पासून रक्ताक्षरी अभियान सुरू करण्यात आले होते. या अभियानाचा समारोप रविवारी संविधान चौकात झाला. याप्रसंगी अ‍ॅड. अणे बोलत होते. 

राज्य सरकारच्या एकूण उत्पन्नापैकी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि कर्ज फेडण्यासाठी ६० टक्के पैसे खर्च होतात. उरलेले ४० टक्के उत्पन्न हे जीएसटीपोटी केंद्र सरकार घेऊन गेले आहे. यामुळे महाराष्ट्रासह सर्वच राज्यांचे पैसे संपले असून राज्य सरकारला आपल्या हिश्शाचे पैसे आणण्यासाठी दिल्लीपुढे हात पसरावे लागतात, असे अणे यांनी सांगितले.