रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 9 जून 2021 (13:31 IST)

माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांचे ओएसडी राम खांडेकर यांचे नागपुरात निधन

माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचे स्वीय सचिव राम खांडेकर राम खांडेकर याचं मंगळवारी रात्री प्रदीर्घ आजाराने त्यांच्या मूळ गावी नागपुरात निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. 
 
त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा मुकूल, सून संगीता, दोन नातवंडं असा परिवार आहे. खांडेकर यांनी देशाचे माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचे विशेष अधिकारी म्हणून काम केलं होतं.  खांडेकर यांनी राव यांच्या निधनापर्यंत त्यांच्यासोबत काम केलं. त्याचबरोबर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांचे सचिव म्हणूनही ते कार्यरत होते.
 
पंतप्रधान कार्यालयातील रावांचे विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख असून अनुभवांवर त्यांनी सत्तेच्या पडछायेत हे पुस्तक लिहिले होते. सत्तेच्या पडछायेत पुस्तक लिहिले होते. 
 
खांडेकर यांनी अनेक वर्तमानपत्र आणि मॅगझिन्समध्ये वेगवेगळ्या विषयांवरचे लेखही लिहिले. राजकारणाबरोबरच खांडेकर यांनी वृत्तपत्र व दिवाळी अंकांसाठी लेखन केलं आहे.