रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 11 सप्टेंबर 2021 (11:32 IST)

गणपती बाप्पा मोरया: दीड दिवसांच्या गणपतीला आज निरोप

गणपती हे आराध्य आणि लाडके दैवत आहे.आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरु असते गणेश चतुर्थी पासून अंनत चतुर्दशी पर्यंत चालणारा हा गणेशोत्सव घरा-घरात अगदी उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. काही ठिकाणी बाप्पा दीड दिवस काही ठिकाणी पाच दिवस,काही ठिकाणी सात दिवस,तर काही ठिकाणी 10 दिवस विराजमान असतात. 
 
आज दीड दिवसाच्या बाप्पा ला निरोप दिला जात आहे.बाप्पाच्या आगमनाने घरात एक आनंदच वातावरण असत.लोकं बाप्पाच्या आगमनाची तयारी महिन्याभरापासून सुरु करतात. आरास करतात.देखावे करतात आणि आपल्या बाप्पाचे दणक्यात स्वागत करतात. घरात आनंदोत्सव असतो.वातावरण पवित्र आणि सात्विक होते.आज काही घरात आपल्या बाप्पा ला निरोप देतात.सर्व मंगल होवो या कामनेसह गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत बाप्पाचे विसर्जन केले जाते