मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 30 मे 2019 (09:33 IST)

हेल्मेट घातले नाही म्हणून लाखो रुपयांचा फटका

शिर्षक वाचून अनेकांना वाटेल की हेल्मेट न घातल्याने कोणाला दंड झाला आहे की काय ? मात्र असे नाही. तामिळनाडू येथे हेल्मेट घातले नाही म्हणून इन्शुरन्सचे तब्बल सहा लाख रुपये एकाला गमवावे लागले आहेत. दुचाकीचालकच्या मागे बसलेला सहप्रवासी हेल्मेट वापरत नाही. याचमुळे मदुरै येथील एका व्यक्तीस महागात पडलं आहे. २०१३ साली अपघात घडला तेव्हा दुचाकीस्वाराच्या मागे बसलेल्या सहप्रवाश्याच्या डोक्यास दुखापत झाली होती. दरम्यान इन्शुरन्स कंपनीकडून मिळणारे ६ लाख रुपये  हेल्मेट न वापरल्याने त्याला हातातून  गमवावे लागले आहेत. मोटार अ‍ॅक्सिडेंट्स ट्राइब्यूनल मदुरै यांनी सर्व बाबींचा तपास करून अपघातात जखमी झालेल्या तरुणास ४५.५ लाख रुपये देण्याचे आदेश दिले. ट्राइब्यूनलने नंतर अपघातग्रस्त तरुणाने हेल्मेट न घातल्याने ६ लाख रुपये कमी करत ३९.५ लाख इतकी केली आहे. अपघातातग्रस्त आणि याचिकाकर्ता तरुण एम. विग्नेश्वरन याने नुकसान भरपाई म्हणून ४० लाख रुपयांची मागणी केली, मदुरै येथे २०१३ साली अवनियापुरम बायपास रोडवर एका बाईकने दुसऱ्या बाईकला धडक दिल्याने विग्नेश्वरनला डोक्यास गंभीर दुखापत झाली, विग्नेश्वरन हा बाइकस्वाराच्या मागे बसला होता. तो १६ जानेवारी २०१३ रोजी मित्राच्या बाईकवर मागच्या सीटवर बसून प्रवास करत होता. याचिकेत दिलेल्या माहितीनुसार, रस्ता ओलांडताना पेट्रोल पंपकडे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका मोटारबाइकने त्यांना जबर धडक दिली. बाईकवर मागे बसलेल्या तरुणास अपघातात डोक्यास मार लागला. सोबत मेंदूस मार देखील लागला होता. मदुरै येथील नजीकच्या रुग्णालयात विग्नेश्वर याच्यावर तीन महिने उपचार सुरु होते. तसेच केरळ येथील रुग्णालयात देखील त्याच्यावर पूर्ण बरं होईपर्यंत फिजिओथेरपीचा उपचार घ्यावा लागला.
 
बाईकचालक आणि त्याचा मागे बसलेला मित्र जबाबदार असल्याचे नमूद केले. इन्शुरन्स कंपनीने ट्राइब्यूनलकडे युक्तिवाद करताना सांगितले की, कोणताही इशारा न करता बाईक वळविल्याने दुसऱ्या बाइकस्वारास न कळल्याने तो गोंदळून गेल्याने हा अपघात झाला होता. ट्राइब्यूनलचे न्या. थंगावेल यांनी उभयपक्षांचा युक्तिवाद ऐकून याचिकाकर्त्यास हेल्मेट न वापरल्याने अपघातादरम्यान डोक्यास गंभीर दुखापत झाली होती, मद्रास हायकोर्टाच्या एका निर्णयाचा दाखला देत हेल्मेट न वापरल्याने बेजबाबदारपणामुळे १५ टक्के रक्कम करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तुम्ही हेल्मेट पोलिसांना घाबरून घालत असाल तर ते चूक आहे, हेल्मेट न घातल्याने डोक्याला इजा तर झाली सोबत सहा लाख रुपये सुद्धा हातातून गेले.