शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 फेब्रुवारी 2019 (09:01 IST)

डीएसकेच्या ९०४ कोटी रुपयांच्या मालमत्तांवर जप्ती

डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्सकडून गुंतवणुकदारांच्या आर्थिक फसवणूकप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने (ई.डी.) मनी लॉडरिंग अ‍ॅक्टनुसार डीएसके समूहाच्या ९०४ कोटी रुपयांच्या मालमत्तांवर जप्ती आणली आहे. त्यामध्ये जमीन, इमारत, सदनिका, जीवनविमा योजनांमधील गुंतवणूक, बँक खात्यांमधील रोख ठेवी यांचा समावेश आहे.
 
डी. एस. के. समूहाच्या वतीने राज्यातील गुंतवणुकदारांची १ हजार १२९ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. याबाबत डी. एस. कुलकर्णी, त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी व मुलगा शिरीषकुलकर्णी यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या तिघा संचालकांनी विविध ठेवी जमा योजना राबवून त्यामध्ये ३५ हजार गुंतवणूकदार, ठेवीदारांनी ठेवलेल्या १ हजार १२९ कोटी रुपयांचा अपहार करुन फसवणूक केली आहे. गोळा केलेल्या ठेवीतून अमेरिकेत १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम पाठवून तेथे मालमत्ता खरेदी केल्याचे तपासात दिसून आले आहे.