मीही आंदोलनात सहभागी होऊन एक दिवस अन्नत्याग करत आहे - शरद पवार

sharad panwar
Last Modified मंगळवार, 22 सप्टेंबर 2020 (17:12 IST)
शेती बिलावरून राज्यसभेत झालेल्या राड्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील खासदार शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी राज्यसभेत आक्रमक झालेल्या खासदारांची पाठराखण केली. तसेच, विधेयक पारित करण्यात सरकारकडून राबवण्यात आलेलं धोरण आणि खासदारांचं निलंबन याविरोधात खासदारांनी केलेल्या आंदोलनात मीही सहभागी होऊन एक दिवस अन्नत्याग करत आहे, असं शरद पवारांनी जाहीर केलं. तसेच, ‘ज्या बिलावर ३ ते ४ दिवस चर्चा होणं आवश्यक होतं, ते बिल रेटून नेण्याचा प्रयत्न असल्याचं दिसत होतं. हे बिल सत्ताधाऱ्यांकडून तातडीने मंजूर करून घेण्याचा आग्रह होता. त्यावर सदस्यांची मतं विचारात घेतली गेली नाहीत, मतं मांडण्याची संधी सदस्यांना देण्यात आली नाही’, असं देखील शरद पवार यावेळी म्हणाले.
शरद पवार म्हणाले, ‘राज्यसभेत मांडलेल्या विधेयकावर काही सदस्यांना आपली भूमिका मांडायची होती, मतं द्यायची होती. मात्र, त्यांना ती संधी न देता विधेयक पुढे रेटून नेलं. उपसभापतींची ही कृतीच लोकशाहीविरोधी आहे. मी ५० वर्षांहून अधिक काळ संसदीय पद्धतीमध्ये काम केलं आहे. पण पीठासीन अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारचं वर्तन अजिबात अपेक्षित नव्हतं’, असं म्हणत शरद पवारांनी टीका केली आहे.


यावर अधिक वाचा :

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...
आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्याच झालेला सामना CSKने 10 धावांनी ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून
तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम केला
नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाच्या शौर्य योद्धांना 88व्या भारतीय ...

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या
सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला ...

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल
दौंडमधील भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली ...

जितेंद्र आव्हाड: शरद पवारांचा जन्म जनसेवेसाठीच झाला आहे

जितेंद्र आव्हाड: शरद पवारांचा जन्म जनसेवेसाठीच झाला आहे
शरद पवार यांचा जन्म जनसेवेसाठीच झाला आहे, असं राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे ...

अमित राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल

अमित राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात ...

भयंकर : आईनेच ४१ तासांपूर्वी जन्मलेल्या मुलीचा गळा आवळला

भयंकर : आईनेच ४१ तासांपूर्वी जन्मलेल्या मुलीचा गळा आवळला
सांगलीतील सिव्हिल रुग्णालयामध्ये जन्मदात्या आईनेच ४१ तासांपूर्वी जन्मलेल्या गोंडस मुलीचा ...

हॉटेल, बारसाठी किमान रात्री साडेअकरापर्यंतची वेळ वाढवून

हॉटेल, बारसाठी किमान रात्री साडेअकरापर्यंतची वेळ वाढवून द्या
रात्रीच्या वेळेतच हॉटेल, रेस्टॉरंटचा निम्म्याहून अधिक व्यवसाय होतो. मद्यालयामध्ये (परमिट ...

धीर सोडू नका प्रशासन तुमच्यासोबत खंबीर पणे उभे आहे : ...

धीर सोडू नका प्रशासन तुमच्यासोबत खंबीर पणे उभे आहे : मुख्यमंत्री
राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी ...