सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 27 जुलै 2021 (16:09 IST)

तिकिटासाठी कुणी मनसेत प्रवेश करत असेल तर अजिबात मनसेत प्रवेश करू नका

ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे सैनिकांशी संवाद साधला.राज यांनी पुणे,नाशिकच्या दौऱ्यावर मनसे सैनिकांना ज्या सूचना दिल्या होत्या. त्याच सूचना आज ठाण्यातील मनसे सैनिकांना दिल्या.तिकिटासाठी कुणी मनसेत प्रवेश करत असेल तर अजिबात मनसेत प्रवेश करू नका,असं फर्मानच राज ठाकरे यांनी सोडलं.
 
यावेळी त्यांनी राज्यातील पूरपरिस्थिवरही भाष्य केलं.प्रत्येक जण आपआपल्या पद्धतीने पूरग्रस्तांना मदत करत आहे.मीही आवाहन केलं होतं.त्यानुसार मनसे सैनिकांनी प्रत्येक गावात जाऊन मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. इतरही पक्षाचे लोक मदत करत आहेत.अशावेळी मदत करणं महत्त्वाचं आहे.नुसता पाहणी दौरा करण्यात काही अर्थ नाही. जेवढी मदत पूरग्रस्तांना मिळेल तेवढं चांगलं आहे, असं ते म्हणाले.
 
हे दिले सल्ले 
* सोशल मीडियाचा वापर कमी करा
* स्थानिक पत्रकारांना धरून राहा. तुमच्या कार्यक्रमाची माहिती त्यांना द्या. असे कार्यक्रम करा की स्थानिक पत्रकार देखील तुमच्यावर खुश असतील
* प्रभाग अध्यक्षपद रद्द करण्यात येणार आहे. प्रभाग अध्यक्षपदी दुसरा पर्याय देण्यात येणार. पुण्यात जसा पर्याय निवडला तसाच ठाण्यात निवडणार
* 25 दिवसांनंतर ठाण्यात देखील प्रभाग अध्यक्षपदाला पर्याय देणार
* निवडणुकीच्या तयारीला लागा
* ठाणे महानगरपालिकेत 130 नगरसेवक आहेत. तेवढेच वार्ड, शाखाध्यक्ष मला पाहिजेत. शाखाध्यक्षांची संख्या जास्त वाढवत बसू नका. शाखा अध्यक्ष हाच पक्षाचा कणा आहे
* अजून एकमेकांशी हेवेदावे करू नका. एकमेकांशी जोडून राहा. पक्षबांधणी करा. नव्यांनी आणि जुन्यांनी एकमेकांशी वाद करू नका. मनसे पक्ष कसा बळकट होईल यासाठी विचार करा. त्याच्यासाठी मेहनत करा
* जे नवीन येतील,जे तिकिटासाठी येत असतील त्यांनी तिकीटासाठी येऊ नका.