शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (12:43 IST)

सुनसगावजवळील फॅक्टरीत स्फोट, दोन कामगार जागीच ठार

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील सुनसगाव रस्त्यावरील एका फॅक्टरीत स्फोट झाल्याची घटना घडली. यात दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या स्फोटाने परिसर हादरला आहे. ही घटना आज शुक्रवारी घडली असून मृतांमध्ये मध्यप्रदेशासह भुसावळातील मजुराचा समावेश आहे.
 
समजलेल्या माहितीनुसार, सुनसगाव रस्त्यावर दिया कॉपर मास्टर अलायन्स फॅक्टरी आहे. या फॅक्टरीतील भरलेल्या ऑईल टाकीला दोन मजुरांकडून शुक्रवार, 21 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास वेल्डींग केले जात असताना अचानक स्पार्कींग होवून मोठा स्फोट झाला व या घटनेत दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. स्फोटाच्या आवाजाने परीसरात मोठा आवाज झाल्याने अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली.
 
पोलिस अधिकार्‍यांची घटनास्थळी
भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रकाश वानखेडे व सहकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून घडलेल्या घटनेची माहिती घेतली जात आहे. दरम्यान, भुसावळचे आमदार संजय सावकारे यांना घटनेची माहिती मिळताच तातडीने त्यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली.