मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 12 जून 2022 (13:49 IST)

संजय राऊतांनी आचार संहिता भंग केल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप

राज्यसभा निवडणुकाचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. भाजपचे तिन्ही उमेदवार या निवडणुकीत जिंकले आहे. किरीट सोमय्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊतांवर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप केला आहे. संजय राऊतांनी सहा आमदारांची नावे घेतली त्यांना मतदानाबाबत कसं काय कळलं , असा प्रश्न देखील सोमय्या यांनी  केला आहे. त्यांनी ही नावे कोणत्या आधारावर घेतल्याचे देखील म्हटले आहे. राऊतांवर सोमय्यांनी गुप्त मतदान भंग केल्याचा आरोप केला असून या प्रकरणाची निवडणूक आयोगानं चौकशी करावी अशी मागणी भाजप ने केली आहे आणि या बाबत राऊतांनी उत्तर द्यावे.  
 
अपक्षांनी कोणाला मत दिले आहे याची माहिती फक्त निवडणूक आयोगाला असते. त्यांनी सहा मतदारांची नाव कसे काय घेतले असं करून राऊतांनी निवडणूक आयोगाचा भंग केला आहे, निवडणूक आयोगानं या प्रकरणात चौकशी करावी. अशी मागणी  किरीट सोमय्या यांनी केली आहे.