'ते' पत्र बेकायदशीर, यावर आम्ही कायदेशीर उत्तर देऊ : केसरकर

Deepak Vasant Kesarkar
Last Modified शनिवार, 2 जुलै 2022 (15:20 IST)
शिवबंधन हे खरं नाते, अफिडेव्हिट हे खरं बंधन नाही. शिवसेना पक्षप्रमुख
उद्धव ठाकरे यांनी काही वक्तव्य केले तर आम्ही उत्तर देणार नाही. शिवसेने एकनाथ शिंदे यांना नेते पदावरुन हटविल्याचे पाठवलेलं पत्र बेकायदशीर आहे. यावर आम्ही कायदेशीर उत्तर देऊ. त्यांनी ऐकलं नाही तर पुढील भूमिका घेऊ, असा थेट इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिला आहे.

सभागृहाच्या नेत्याचा अपमान होतो तेव्हा हक्कभंग येतो. इतकं हे पद महत्वाचे आहे. त्यांच्या पक्षांला हे शोभणार नाही. ही कृत्य लोकशाहीला शोभादायक नाही. आमच्याकडे राजकारणाची चर्चा होत नाही. कायदेशीर लढाई असेल तर त्याला कायदेशीर उत्तर देवू. पहिल्यादा अध्यक्ष निवड त्यानंतर विश्वासदर्शक ठराव येईल. त्यानंतर मंत्रिमंडळाची चर्चा होईल. आता कोणतीच चर्चा त्या संदर्भात झालेली नाही. आमचं कुटुंब एकत्र आहे. पण आमचे कुटुंब प्रमुख बाहेर आहे. ते आमच्यात आले तर आम्हाला आनंद होईल, असे दीपक केसरकर म्हणाले.
शिदे यांनी आपण शिवसेनेचेच आहोत, असे वारंवार सांगितले. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ही बाब रुचलेली नाही. शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत. शिवसैनिकांमध्ये जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांची काल शिवसेना नेते पदावरुन हकालपट्टी करण्यात आली होती. शिवसेनेने याबाबतचं पत्र काढलं आहे. या कारवाईमुळे आता शिंदे विरुद्ध ठाकरे असा वाद चिघळण्याची शक्यता होती. आज शिंदे गटाकडून उत्तर देताना इशारा देण्यात आला आहे. याबाबत दीपक केसरकर यांनी गोव्यात पत्रकार परिषद घेत उत्तर दिले आहे.


यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

Corona : जपानमध्ये कोरोनाचे धोकादायक रूप, एका दिवसात अडीच ...

Corona : जपानमध्ये कोरोनाचे धोकादायक रूप, एका दिवसात अडीच लाखांहून अधिक रुग्ण आढळले
कोरोना विषाणूच्या सातव्या लाटेचा सामना करत असलेल्या जपानमध्ये शुक्रवारी 26,1029 नवीन ...

मनीष सिसोदिया यांच्या घरातून CBIची टीम रवाना, 14 तासांची ...

मनीष सिसोदिया यांच्या घरातून CBIची टीम रवाना, 14 तासांची चौकशी
दारू घोटाळ्याबाबत सीबीआयचे पथक दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरातून रवाना ...

इचलकरंजी शहराला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा देणार

इचलकरंजी शहराला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा देणार
इचलकरंजी शहराला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा देण्यासह त्याठिकाणी तहसिल कार्यालय सुरु ...

डॉल्बी वाजायलाच हवी आणि ती का वाजू नये याचे उत्तर देणारे ...

डॉल्बी वाजायलाच हवी आणि ती का वाजू नये याचे उत्तर देणारे द्या, उदयनराजे भोसले यांचा सवाल
गणेशोत्सवात डॉल्बी वाजायलाच हवी आणि ती का वाजू नये याचे उत्तर देणारे पत्रकच डॉल्बीला नकार ...

गुलाबराव पाटील म्हणाले ‘मी मंत्री आहे’, नीलम गोऱ्हे ...

गुलाबराव पाटील म्हणाले ‘मी मंत्री आहे’, नीलम गोऱ्हे म्हणतात, ‘आता खाली बसा’
राज्यातल्या सगळ्या राजकीय नाट्यानंतर अखेर पावसाळी अधिवेशनाच्या मूहूर्ताचा दिवस उजाडला ...