1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 26 मे 2024 (17:12 IST)

Maharashtra Heatwave : अकोल्यात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद, कलम 144 लागू

सध्या महाराष्ट्रात काही ठिकाणी उष्णता चांगलीच जाणवत आहे. तापमानात वाद होत असून नागरिक उकाड्याने हैराण झाले आहे. गेल्या दोन दिवसांत अकोला हे महाराष्ट्रातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे. 
 
गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक भागात तापमानात वाढ होत आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, अकोल्यात गेल्या काही दिवसांत कमाल तापमान 44 अंश सेल्सिअस ते 45.8 अंश सेल्सिअस दरम्यान होते.
 
गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्रातील अकोला जिल्हा राज्यातील सर्वात उष्ण शहर ठरला आहे, जिथे कमाल तापमान 45 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवले गेले. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) ही माहिती दिली.
 
अकोल्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांनी शनिवारी 31 मे पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहितेचे (सीआरपीसी) कलम 144 लागू केले. कामगारांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि पंख्यांची पुरेशी व्यवस्था करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी आस्थापनांना दिले. खासगी कोचिंग क्लासेसच्या वेळेत बदल करण्याचे आणि दुपारच्या वेळी ते न घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
 
आयएमडीच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्राच्या विदर्भात असलेल्या अकोला येथे शुक्रवारी 45.8 अंश सेल्सिअस आणि शनिवारी 45.6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. शहरातील या महिन्यातील हे या हंगामातील सर्वाधिक तापमान आहे.
 
26 मे 2020 रोजी 47.4 अंश सेल्सिअस तापमानासह अकोला हे देशातील दुसरे सर्वात उष्ण शहर होते. या तारखेला मध्य प्रदेशातील खरगोन हे देशातील सर्वात उष्ण शहर होते. अकोला जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी शनिवारी 31 मे पर्यंत  कलम 144 लागू केले.

Edited by - Priya Dixit