मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 डिसेंबर 2018 (09:22 IST)

एसटी महामंडळात पदोन्नतीसाठी नवी संधी

एसटी महामंडळातील चालक, वाहक, सहाय्यक, शिपाई व तत्सम पदावरील कर्मचाऱ्यांना आता पदोन्नतीसाठी लिपिक-टंकलेखक संवर्गामध्ये २५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी गुरुवारी  केली. एसटी महामंडळातील चतुर्थ श्रेणी पदावरील कर्मचाऱ्यांना सरकारच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे. त्यानुसार, चालक, वाहक, सहाय्यक, शिपाई, नाईक, हवालदार, उद्वाहन चालक, मजदूर, परिचर, खानसामा, अतिथ्यालय परिचर, सफाईगार, सुरक्षा रक्षक, खलाशी, सहाय्यक माळी, माळी व स्वच्छक या पदावरील कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणार आहे. राज्यात या पदावर सुमारे १ लाख कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी विहीत शैक्षणिक अर्हता पूर्ण करणारे कर्मचारी लिपीक-टंकलेखक पदासाठी पात्र ठरतील. 
 
या निर्णयामुळे महामंडळातील शिक्षित कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार असून त्यांच्यासाठी ही नामी संधी आहे. याआधी पात्रता असूनही त्यांना लिपिक पदासाठी किंवा टंकलेखक पदासाठी अर्ज करण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र, परिवहनमंत्री दिवाकर रावतेंच्या या घोषणेमुळे या युवकांना आता नव्याने ही संधी चालून आली आहे.