निलेश राणे यांची शिवसेना खासदारावर जहरी टीका, म्हणाले कुडाळच्या जंगलात
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी पुन्हा शिवसेनेवर जहरी टीका केली असून, आहे. यावेळी निलेश राणे यांनी टीकेचे पातली घसरली आहे. निलेश राणे यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा फोटो शेअर करत त्यावर 'डुक्कर पकडला ' असा उल्लेख केला आहे.
कोकणात राणे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. त्यातून मग दोघेही एकमेकांवर जोरदार टीका करतात. आता या टीकेची पातळी घसरताना दिसत आहे. एकमेकांवर आरे-तुरे करून टीका करणं इथंपासून ते आता प्राण्यांची उपमा देणं इथंपर्यंत हे राजकारण सुरु झाले आहे.
माजी खासदार निलेश राणे यांनी विनायक राऊत यांच्यावर टीका करताना त्यांचा एक फोटो शेअर केला असून, त्यावर कॅप्शन लिहिलं आहे की, 'आज दुपारी कुडाळच्या जंगलात काही लोकांनी डुक्कर पकडला.' निलेश राणे यांच्या या ट्वीटवर लोकांनी संताप व्यक्त केला आहे. 'आपले वडील सुसंस्कृत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते याची तरी जाणीव ठेवा,' असा सल्ला एका ट्वीटर युझरने निलेश राणे निलेश राणेंना दिला आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्याच्या जोरावर स्थापन झालेलं भाजपचं सरकार कोसळल्यावर विनायक राऊत यांनीही नारायण यांच्यावर विखारी टीका केली होती. 'विनायक राऊत यांनी ट्वीट करून राणे यांच्यावर टीका केली होती. राऊत आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले होते की, 'अखेर नारायण राणे यांच्या पनवतीने देवेंद्र फडणवीस बुडाले, आता नारायण राणे यांनी गणिताचा अभ्यास करत बसावे..'