'नाणार' नाहीच, शिवसेनेचा विरोध कायम

nanar prakalp
सिंधुदुर्ग| Last Modified सोमवार, 17 फेब्रुवारी 2020 (14:15 IST)
'नाणार' प्रकल्पासंबंधीची शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मध्ये प्रसिद्ध झालेली जाहिरात आणि शिवसेनेची प्रकल्पविरोधी भूमिका या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. प्रकल्प नकोच अशी शिवसेनेची भूमिका आहे, असे पक्षाचे खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट केले.
'सामना' या वृत्तपत्रात रिफायनरीची जाहिरात प्रसिद्ध झाल्याने प्रकल्प समर्थकांना एकप्रकारे बळ मिळाल्याचे बोलले जात होते. मात्र, सिंधुदुर्गचे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी जाहिरातीसंबंधी स्पष्टीकरण दिले आहे. वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली जाहिरात आणि शिवसेनेची प्रकल्पविरोधी भूमिका या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. प्रकल्प नकोच अशी शिवसेनेची भूमिका आहे, असे ते म्हणाले.
नाणार प्रकल्पाला शिवसेनेने तीव्र विरोध केला होता. विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोकण दौर्यावर असताना, त्यांनी रिफायनरी प्रकल्प होऊ शकतो, असे संकेत दिले होते. मात्र, निवडणुकीनंतर शिवसेनेच नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर नाणार प्रकल्प गुंडाळणार असे वातावरण तयार झाले होते. मात्र, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिकात प्रकल्पासंबंधी जाहिरात प्रसिद्ध झाल्याने प्रकल्प समर्थकांना पुन्हा बळ मिळाल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे भाजपचे नेते नीतेश राणे यांनी प्रकल्पाबाबत शिवसेना घेत असलेल्या भूमिकेची खिल्ली उडवली. तर माजी आमदार प्रमोद जठार यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

विप्रो समुहाकडून मोठी मदत जाहीर

विप्रो समुहाकडून मोठी मदत जाहीर
कोरोनाविरुद्ध सुरु असलेल्या लढाईत विप्रो लिमिटेड, विप्रो एन्टरप्राईज आणि अझीम प्रेमजी ...

दिलासादायक बातमी : एलपीजी गॅस सिलेंडर सुमारे ६० रुपयांनी ...

दिलासादायक बातमी : एलपीजी गॅस सिलेंडर सुमारे ६० रुपयांनी स्वस्त
एलपीजी गॅस सिलेंडर सुमारे ६० रुपयांनी स्वस्त झाला आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने याची घोषणा ...

निजामुद्दीनमधल्या आयोजक मौलानासह सहा जणांवर गुन्हे दाखल

निजामुद्दीनमधल्या आयोजक मौलानासह सहा जणांवर गुन्हे दाखल
निजामुद्दीनमधल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाने दिल्ली हादरली. या कार्यक्रमाने तर अनेकांना ...

काही कट्टरपंथी मुस्लिमांकडूनच PM मोदींच्या लॉकडाऊनला विरोध ...

काही कट्टरपंथी मुस्लिमांकडूनच PM मोदींच्या लॉकडाऊनला विरोध : रिझवी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारतीयांच्या भल्यासाठी लॉकडाउनसारखा मोठा निर्णय ...

करोना पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी शिवभोजन योजना सुरु करा

करोना पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी शिवभोजन योजना सुरु करा
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब जनता ...