मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 29 ऑक्टोबर 2020 (16:06 IST)

आता शाळांमधली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्के

राज्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत सर्व आस्थापना टप्प्या-टप्प्याने सुरु करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत आता शाळांमधली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती ही ५० टक्के करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
 
राज्यातील शाळा, महाविद्यालयं, शैक्षणिक संस्था ३१ ऑक्टोबर पर्यंत विद्यार्थी व नियमित वर्गासाठी बंद राहतील मात्र ऑनलाइन, ऑफलाइन शिक्षण आणि दूरस्थ शिक्षण सुरु करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. ऑनलाइन, ऑफलाइन शिक्षण, दूरस्थ शिक्षण, टेलि काऊन्सिलिंग आणि त्याच्याशी संबंधित कामकाज करण्यासाठी राज्यातील शासकीय, खासगी अनुदानित, विनाअनुदानित इत्यादी सर्व प्रकारच्या शिक्षण संस्थामार्फत चालवण्यात येणाऱ्या शाळांमधील ५० टक्के शिक्षक व शिकक्षकेतर कर्मचारी यांनी ऑनलाइन, ऑफलाइन, दूरस्थ शिक्षण संस्थांशी संबंधित कामांसाठी तातडीने कामावर रुजू व्हावे असे सरकारने म्हटले आहे.