नंदुरबारमध्ये विवाह सोहळ्यात आता एवढ्या व्यक्तींनाच परवानगी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Corona n marriage
Last Modified मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021 (09:36 IST)
नंदुरबार आणि शहादा शहरात कोरोनाचा संसर्ग अधिक प्रमाणात असल्याने महसूल, पोलीस, आरोग्य आणि नगरपालिका यांचे एकत्रित पथक तयार करून विवाह सोहळ्याच्या ठिकाणी भेट द्यावी आणि 50 पेक्षा अधिक नागरिक दिसून आल्यास कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले. दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते.
डॉ.भारुड म्हणाले, विवाह सोहळ्यात अधिक संख्येने नागरिक आढळल्यास कारवाई करून मंगल कार्यालय बंद करण्यात यावे. मंगल कार्यालयाबाहेर कोरोना विषयक सुचनांचा फलक लावण्यास सांगावे. कोरोना बाधित व्यक्तींचे शासकीय किंवा खाजगी रुग्णालयात अलगीकरण होईल याची खात्री करावी.

कोरोना बाधित आढळत असलेल्या भागात शिबीर आयोजित करून स्वॅब संकलन करावे. दुकान आणि बाजारात मास्क न घालणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात यावी. अशाच स्वरुपाची कारवाई करण्यासाठी बस आणि रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी बैठेपथक नियुक्त करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.

पंडीत म्हणाले, मंगल कार्यालय चालकांची बैठक घेण्यात आली असून त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. मंगल कार्यालयात नियमांचे पालन न झाल्यास ते सील करण्यात यावे. व्यावसायिकांनी देखील नियमांचे पालन न केल्यास त्याच्यावर देखील पोलीसांमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी मास्कचा वापर न केल्यास अधिक कठोर कारवाई करण्यात येईल.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

कोणी मुख्यमंत्री देता का मुख्यमंत्री : नितेश राणे

कोणी मुख्यमंत्री देता का मुख्यमंत्री : नितेश राणे
भाजप आमदार नितेश राणे यांनीही मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर खोचक शब्दांत टीका केली आहे

‘नटसम्राट’ पाहात असल्याचा भास झाला”, असं म्हणत ...

‘नटसम्राट’ पाहात असल्याचा भास झाला”, असं म्हणत मुख्यमंत्र्यांची मुनगंटीवारांना कोपरखळी
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर

केंद्र सरकारमुळेच मराठीला अद्याप अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ...

केंद्र सरकारमुळेच मराठीला अद्याप अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नाही : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारकडून यासंदर्भात सर्व पूर्तता झाली असून ...

भाजपकडून 'कोविडचा भ्रष्टाचार' या पुस्तिकेचे प्रकाशन

भाजपकडून 'कोविडचा भ्रष्टाचार' या पुस्तिकेचे प्रकाशन
विधिमंडळ अधिवेशन सुरू असतांना भाजपने 'कोविडचा भ्रष्टाचार' या पुस्तिकेचे प्रकाशन केले.

स्‍वाभिमानी पक्ष महागाईविरोधात राज्‍यव्‍यापी आंदोलन करणार

स्‍वाभिमानी पक्ष महागाईविरोधात राज्‍यव्‍यापी आंदोलन करणार
शेतकरी विरोधी धोरणाबरोबरच महागाईविरोधात राज्‍यव्‍यापी आंदोलन करण्‍याचा निर्णय