बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 सप्टेंबर 2021 (08:56 IST)

गावठी कट्ट्यावर दहशत, लिंबू राक्या पोलिसांच्या जाळ्यात

नाशिक शहरातील वाल्मिक नगर परिसरात राकेश उर्फ लिंबु राक्या चंद्रकांत साळुंखे हा गावठी पिस्टल कब्जात बाळगून दहशत माजवत असल्याची माहिती पो.नि. बळीराम हिरे यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे कारवाई करत त्याला अटक करण्यात आली आहे.

कांचन नगर परिसरात राहणारा राकेश उर्फ लिंबु राक्या चंद्रकांत साळुंखे हा गावठी पिस्टल कब्जात बाळगून दहशत माजवत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांना मिळाली होती. शनिपेठ पोलीस ठाण्याचे हवालदार परिष जाधव, राहुल पाटील, प्रमोद पाटील व शरद पाटील यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेत त्याला अटक केली आहे. अधिक तपास परिष जाधव करत आहेत.