सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 सप्टेंबर 2022 (10:37 IST)

Rain Update :राज्यात पुढील 3 दिवस या भागात बरसणार पावसाच्या सरी

monsoon
राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. या साठी पुढील दोन दिवसात अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. ओडिशा ,आंध्रप्रदेशच्या किनारी पट्टिभागात, छत्तीसगड मध्ये 21 तारखे पर्यंत जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. वायव्य आणि लगतच्या पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भ आणि मध्यप्रदेशातील पूर्व भागात 20 ते  22 सप्टेंबर पर्यंत मेघसरी बरसण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. 
 
गेल्या साडेतीन महिन्यांपासून पावसाने संपूर्ण देशात जोरदार हजेरी लावली असून आता परतीच्या प्रवासाला निघाला आहे. 21 तारखे पासून पश्चिम राजस्थान मधून परतीच्या प्रवासाला सुरुवात होणार असून पुढील आठ दिवस महाराष्ट्रात येणार. राज्यात आणि गुजरातच्या किनारपट्टीवर हवेची द्रोणीय स्थिती निर्माण होऊन राज्यात 19 ते 22 सप्टेंबर पर्यंत मेघसरी कोसळणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.  
 
येत्या तीन दिवसांत म्हणजे २१ सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थानातून मान्सूनच्या परतीला सुरुवात होत आहे. त्यापाठोपाठ पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली या ठिकाणांहून तो आगामी पाच दिवसांत परतीला निघेल. महाराष्ट्रातून जाण्यास आठवडा लागेल
 
मान्सून राजस्थानातून परतीचा प्रवास करण्यासाठी  21 रोजी निघणार आहे. महाराष्ट्रातून निघण्यास किमान सात ते आठ दिवस लागतील. २८ सप्टेंबरदरम्यान तो महाराष्ट्रातून पुढे जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सप्टेंबरचा शेवटचा आठवडा हलका ते मध्यम पावसाचा असण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.