मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 18 जून 2022 (09:12 IST)

धुळ्यात सैराटची पुनरावृत्ती; पळून जाण्यापूर्वीच भावानं बहिणीला संपवलं,आरोपी भावाला अटक

murder
धुळ्यातील साक्री तालुक्यात निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सैराटची पुनरावृत्ती झाल्याचे बघायला मिळाले आहे. बावीस वर्षीय बहिणीचे कोणाशीतरी प्रेमसंबंध असल्याचा संशय व त्याच्यासोबत ती पळून जायच्या बेतात असल्याचा राग मनात धरून तिला मारहाण करून, गळफास लावून खून करत रात्रीच तिचा अंत्यविधी उरकून टाकल्याची दुर्दैवी व धक्कादायक घटना धुळ्याच्या साक्री तालुक्यामध्ये उघडकीस आली आहे . पोलिसांनी अत्यंत शिताफीने संशयित भावास गजाआड केले आहे. संदिप रमेश हालोर वय-24 याने त्याची बहिण पुष्पा हिचे कोणाशीतरी प्रेमसंबंध असल्याचा संशय घेवून तिस मारहाण करत गळफास लावून मारले व रात्रीच तिचा अत्यंविधी आटोपून टाकला, अशी गोपनीय माहिती मिळाल्याने निजामपूर पोलिस तपास पथकाने हट्टी गाव परिसरात रवाना होवून बातमीची खातरजमा केली असता आरोपी संदीप हालोर हा गावातच सापडला आला.
 
दरम्यान, पोलिसांनी त्यास विश्वासात घेवून विचारपूस केली असता आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली व सांगितले की, हट्टी गावाशिवारातील शिवमेंढा येथे रात्रीचे तीन वाजेचे सुमारास त्याची बहीण पुष्पा रमेश हालोर वय-22 हिचे एका मुलाशी प्रेमसंबंध असल्याने ती पळून जाण्याच्या बेतात असल्याने, त्याचा राग मनात धरून त्याने तिचे अंगावरील साडीची लेस फाडून निंबाच्या झाडाला बांधून फास तयार करत, गळफास लावून जीवे ठार मारण्याच्या इराद्याने ढकलून देत तिचा जीव जाईपर्यंत तेथेच थांबून राहिला व त्यांनतर घरी जावून पुष्पा हिने स्वत:च्या हाताने गळफास घेवून मयत झाल्याचे भासवून आई व मित्रांसह गावातील लोंकाना खोटी माहिती दिली व पहाटे पाचच्या सुमारास तिच्यावर घाई घाईत अंत्यसंस्कार देखील केले. अंत्यविधी करते वेळी तिचे अंगावरील सर्व कपडे तसेच गळफास तयार केलेली साडीची लेस असे सर्व पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने दहनात टाकून पुरावे नष्ट केल्याचे सांगितले. परंतु निजामपूर पोलिसांनी याचा संपूर्ण छडा लावत आरोपी भावाला गजाआड केले असून साक्री न्यायालयाने आता या खुणी भावाला एकोणावीस जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.