1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: कोल्हापूर , बुधवार, 4 डिसेंबर 2019 (15:24 IST)

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान राज्यात विविध ठिकाणी आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्या

Revoke the crimes filed against the agitators
मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान राज्यात विविध ठिकाणी आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख होऊ नये, यासाठी नामविस्तार करण्याची मागणीही संभाजीराजे यांनी केली आहे.
 
त्यांच्याव्यतिरिक्त आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार धनंजय मुंडे यांनी मराठा आंदोलनादरम्यान आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची विनंती केली आहे. “मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान अनेक आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेणे आणि कोल्हापुरातील 'शिवाजी विद्यापीठासाहित' महाराष्ट्रातील सर्वच सार्वजनिक स्थळांचे नामकरण हे 'छत्रपती शिवाजी महाराज' असे करणे (उदा. 'छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, कोल्हापूर) बाबत मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी केली आहे.
 
आता आपलं सरकार आलं आहे. त्यामुळे हे गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशीच सर्वांची अपेक्षा आहे,” असं मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं. तर “मराठा समाजाने आरक्षणासाठी शांतीपूर्ण आंदोलन केले. त्यावेळी सहभागी युवकांवर तत्कालीन भाजप सरकारनं दाखल केले. आता ते गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. एकही तरुण या गुन्ह्यांमुळे शिक्षण, नोकरीपासून वंचित राहू नये यासाठी योग्य पाऊल उचलावे,” असं धनजंय मुंडे म्हणाले.